सापडलेली मंगळसूत्र युवकाने केले प्रामाणिकपणे परत

 मनोज तळेकर (विशेष प्रतिनिधी) अवसरी खुर्द (ता-आंबेगाव ज- पुणे )येथील युवक विनय गंगाराम शिंदे यांना सापडलेले अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र प्रामाणिक पणे परत करत एक आदर्श निर्माण केला आहे. 

मंचर कडून अवसरी खुर्द अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन विनय शिंदे जात होते. त्यावेळी त्यांना रस्त्यावर पडलेले अडीच तोळे वजनाचे गळ्यातील मंगळसूत्र सापडले. त्यानंतर विनोद शिंदे यांनी मनामध्ये कोणतीही लालसा उत्पन्न होऊ न देता. सोशल मीडियामध्ये मला मंगळसूत्र सापडले असून ते ज्या व्यक्तीचे आहे त्याने खात्री पटवून घेऊन जावे अशी पोस्ट केली.

 त्यानंतर यास्मिन रशीद खान( रा- अवसरी खुर्द) यांचे मंगळसूत्र हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी विनय शिंदे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना सापडलेले मंगळसूत्र आपले असल्याची खात्री पटवून दिली. 

 विनोद शिंदे यांनी मंचर पोलीस स्टेशन येथे जाऊन सदर महिलेला सापडलेले मंगळसूत्र पोलिसां समक्ष परत केले. मंगळसूत्र परत दिल्याने आणि खान यांनी आभार मानले तर पोलिसांनी; शिंदे यांचे कौतुक केले आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रामाणिक माणसे भेटणे खूप दुर्मिळ झाले आहे मात्र विनय शिंदे यांच्या रूपाने आजही प्रामाणिकपणा जपणारी माणसे शिल्लक असून त्यांच्या अशा कार्याने समाजाला नक्कीच प्रेरणा मिळेल.