मंचर( प्रतिनिधी)आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले ज्वारी पीक अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाले आहे. सातगाव पठारावरील, पेठ,पारगाव, कुरवंडी, भावडी,थुगाव कोल्हारवाडी कारेगाव या गावांमध्ये पावसाळ्यात बटाटा पीकाचे तर रब्बी हगांमात ज्वारी पीकाचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी ऐन काढणीला आलेला बटाटा शेतात असताना मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला.त्यामुळे काढणीला आलेले बटाटा पीक वाया गेले त्यामुळे मोठा आर्थिक तोटा शेतकर्यांना सहन करावा लागला.तर आता ज्वारी पीक भरात असताना अवकाळी पाऊस झाल्याने ज्वारी पीक मोठ्या प्रमाणात पडले आहे. त्यामुळे सातगाव पठारावरील शेतकर्याचे मोठे नुकसान होऊन जनावरांचा कडबाही वाया जाणार असल्याचे चित्र सातगाव पठारावर दिसत आहे.
सातगाव पठारावर अवकाळी पाऊसाने ज्वारीचे नुकसान