अरबी समुद्रामधुन आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यातील शेती व स्थावर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचेे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला दिले आहे.
महाराष्ट्रावर आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी भोर खेड आंबेगाव जुन्नर शिरुर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्यांची उभी पीके भुईसपाट झाली आहेत.तर अनेकांच्या घरावरील छप्पर उडुन गेली आहे. गाई गोठा, कुकुटपालनाचे छप्परही उडुन गेल्यानेही व्यावसायिकांचेही नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी वीजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा पुर्णपणे खंडीत झाला आहे. हा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेशही वळसे पाटील यांनी दिले आहे.