महाविद्यालयीन पदवी व पदव्युत्तर परीक्षा संशोधनात्मक मूल्यमापन आधारे व्हाव्यात - प्रा अमीर इनामदार

 


संपूर्ण जग कोरोना या वैश्विक आजाराशी लढत असताना हे संकट दूर करण्यासाठी आपल्या देशातील पोलीस बांधव वैद्यकीय क्षेत्रातील बांधव सार्वजनिक स्वच्छता क्षेत्रातील बांधव इत्यादी सर्वजण झटत आहेत या महाभयंकर आजारामुळे संपूर्ण देश आणि अर्थव्यवस्था पूर्णतः खुंटलेली आहे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न होत आहेत कोरोना या संकटाशी सामना करताना बहुतांशी व्यवस्थांनी आपली व्यवस्थापनात्मक चौकट बदलली आहे यामध्ये हे महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र होय. 


शैक्षणिक क्षेत्रातील परिवर्तनाचा भाग म्हणजे महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर  सर्व परीक्षा या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.
या विद्याशाखांच्या परीक्षा कशा पद्धतीने व्हाव्यात यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न होत आहेत.


आपण परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक यासंबंधी थोडक्यात माहिती घेऊ...


प्रथमता महाराष्ट्रातील तमाम कृषी महाविद्यालयांच्या परीक्षा या फेब्रुवारी अखेरीस सुरुवात होऊन एप्रिल व मे च्या दरम्यान संपतात परंतु आता कोरोना या महाभयंकर आजारामुळे यावर्षी या परीक्षांचे नियोजन पूर्णतः कोलमडून गेले आहे.या परीक्षा कधी होतील कशा होतील याबाबत अनिश्चितता आहे कोरोना  संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री  आदरणीय राजेशजी टोपे यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच उपाययोजनांचा भाग म्हणून दिनांक 15 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय दिला. 20 मार्च 2020 रोजी दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लॉकडाऊन करत असल्याची घोषणा महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.


यामुळं सर्व महाविद्यालयांच्या परीक्षांचे नियोजन हे पुढे ढकलण्यात आले तेव्हापासून आजपर्यंत या नियोजनाबाबत कोणत्याही प्रकारे अधिकृत जाहीर सुचना आलेली नाही परीक्षांच्या नियोजनासाठी विद्यापीठीय समिती गठित करण्यात आली ही समिती सहा एप्रिल पासून कार्यरत असून दिनांक सात एप्रिल रोजी दैनिक लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार विद्यापीठीय परीक्षांचे नियोजन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पेडणेकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ करमळकर एसएनडीटी  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ वंजारी आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शिंदे शिक्षण संचालक डॉक्टर वाघ आणि उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर माने यांची समिती कोरोना प्रादुर्भाव आणि स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन महाविद्यालय परीक्षांचे नियोजन करण्यासाठी गठित करण्यात आल्याची बातमी पत्रकार परिषदेद्वारे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली 


आपण कोरोना संकट आणि वर्तमानकालीन परीक्षा पद्धती व आवश्यक बदल यासंदर्भात बोलू ...


महाविद्यालयीन पदवी ते पदव्युत्तर पर्यंतच्या परीक्षा या ऑफलाइन पद्धतीने होत असतात काही अंशी या परीक्षा ऑनलाइन सुद्धा होत असतात या परीक्षांमध्ये विद्यापीठाने जाहीर केलेला अभ्यासक्रम आणि होणाऱ्या परीक्षा या ऑफलाइन पद्धतीने होत असून या पद्धतीचा सद्यस्थितीत अवलंब करणे कठीण आहे म्हणजेच प्रथम वर्ष शिकणारा विद्यार्थी हा सर्व आवश्यक विषयांचे पेपर देत असतो तर द्वितीय वर्षात शिकणारा विद्यार्थी एक आवश्यक विषय आणि एक ऐच्छिक विषय घेऊन ऊ प विषयांच्या संदर्भात यामध्ये यामध्ये प्रथम वर्षी पेपर देणारा विद्यार्थी हा सर्व विषयांचे पेपर सोडवत असतो तर द्वितीय वर्षी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी हा ऑप्शनल विषय किंवा पर्यायी विषय घेऊन पेपर देत असतो तृतीय वर्षात शिकणारा विद्यार्थी हा अॉप्शनल विषय घेऊन सर्व पेपर सोडवत असतो यामध्ये या सर्व परीक्षांचे निकाल हे लिखित स्वरूपातील उत्तर पत्रिका गुणदान पद्धतीने तपासल्या जातात पदव्युत्तर पदवी च्या परीक्षेचा विचार केला असता अभ्यास शाखा आणि उपविषय अभ्यास शाखांवर परीक्षा पद्धत ठरवलेली असते आणि याद्वारे निकाल जाहीर केला जातो आता आपण कोरोना संकट आणि परीक्षा घेण्यासंबंधी विद्यार्थ्यांची असणारी मानसिकता व मतप्रवाह याबाबत विचारपूस वर्तमान काल वर्तमान काल स्थितीत विद्यार्थ्यांना आपली परीक्षा कधी होणार याबाबत चिंता आणि ताण या दोन्ही बाबी  आहेत.


महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांनी परीक्षांचे नियोजन करण्यासाठी जरी तयारी केली असली तरी विद्यापीठीय समितीचा अहवाल आल्यानंतरच परीक्षांचे नियोजन करता येणे शक्य आहे परंतु सध्या देशावर ओढवलेल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सोशल डिस्टंसिग आणि योग्य ती आरोग्याची काळजी घेणे गरजेचे बनले आहे यामध्ये पालक वर्ग हा घरी आलेल्या विद्यार्थ्याला पुन्हा महाविद्यालयात परीक्षांसाठी पाठवेल का हाही प्रश्न उद्भवतो.
दुसरी बाजू म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर होत असणारे प्रयत्न आणि आणि यासाठी आवश्यक असणारा जनसहभाग या दोन्हीची सांगड म्हणजे करुनशी लढा होय विद्यापीठांनी परीक्षा  ऑनलाइन होण्याचा पर्याय आहे आणि जर त्या ऑफलाईन होत असतील तर पालकांची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे.


यातील प्रमुख गाभा म्हणजे ऑफलाइन परीक्षा परंपरागत पद्धतीने घ्यायचा झाल्यास परीक्षा नियोजनात झालेला विलंब आणि आता जर परीक्षा घ्यावयाच्या असतील तर गुणदान पद्धती यानंतरचा निकाल आणि होत असणारा विलंब म्हणजेच मनुष्यबळावर ती येणार आतां होय यातूनच पुढील वर्षाचे नियोजन सुद्धा हा एक आव्हानात्मक विषय आहे 


आपण पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी  परीक्षा पद्धती नाविन्यपूर्ण उपाययोजना वर बोलू ...


माझ्या मते परीक्षा कशा व्हाव्यात या ऐवजी परीक्षा पद्धतीमध्ये नावीन्यपूर्ण उपाययोजना चा अंमल झाल्यास परीक्षा या अधिक सुसंगतपणे घेता येतील या नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा आढावा घेताना पुढील बाबी विचारात घेता येतील-


०१. विद्यार्थी संशोधन पुस्तिका तयार होणे.


०२. टास्क ओरिएंटेड एक्झाम सिस्टम चा अंमल होणे. 


०३. लिंक बेस्ट क्वेशन बँक सिस्टम आणि क्विक रिझल्ट प्रणालीचा अवलंब होणे.


०४. स्टूडेंट रिसर्च ओरिएंटेशन ट्रेनिंग प्रोग्राम ची अंमलबजावणी-याद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देणे 


०५.रिसर्च करणाऱ्या विद्यार्थ्याला महाविद्यालय प्राध्यापकांकडून योग्य ते मार्गदर्शन होऊन त्याच्या संशोधनपर जाणिवांचा विकास होण्यासाठी महाविद्यालयीन संशोधक विद्यार्थी अभ्यास गट स्थापन होणे गरजेचे आहे.


वरील मुद्दे अभ्यासात घेताना प्रथमत आपण त्याच्या वैशिष्ट्यं विषयी माहिती घेऊ-


-०१ विद्यार्थी संशोधन पुस्तिका यामध्ये अकृषी विद्यापीठांत-महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी हा संशोधक विद्यार्थी म्हणून नावारूपास येण्यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी संशोधन पुस्तिकेचे निर्मिती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक प्राध्यापकांनी संशोधनाविषयी मार्गदर्शन करून सदर पुस्तिकेचे विद्यापीठाकडून ऊन मानांकन व्हावे विद्यार्थी संशोधन पुस्तिकेचा वापर हा शासन स्तरावरील धोरण निर्मिती व निश्चितीसाठी सहाय्यकारी घटक म्हणून करण्यात यावा.


-०२ टास्क ओरिएंटेड एक्झाम सिस्टम यामध्ये कार्य भिमुख परीक्षा प्रणालीचा वापर होऊन वर्तमान कालीन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे धोरण निर्मिती व धोरण निश्चितीसाठी कसे परिपूर्ण होतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे यामध्ये आपणाला "चॉइस बेस्ट टास्क सिस्टम" चा वापर करून विद्यार्थ्याला तो शिकत असणाऱ्या अभ्यासशाखेआधारे कार्यपद्धत निवडण्याची मुभा प्राप्त व्हावी.सदर अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठ स्तरीय विविध विषयांचा अभ्यास शाखांचा वापर होऊन विद्यार्थ्याने आपल्या आकलना द्वारे कार्यपद्धती अंमल करणे गरजेचे आहे 


-दुसरा भाग म्हणजे चे विद्यार्थ्यांना कार्यपद्धती पूर्ण करताना स्वातंत्र्य देण्यात यावे म्हणजे उदाहरणार्थ जर शिवाजी विद्यापीठाचा पदवी घेणारा विद्यार्थी राज्यशास्त्र विषयासंबंधी आपले संशोधनपर कार्य मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या अभ्यासक्रमाशी संलग्नित होऊन करणार असेल तर त्यास मुभा देण्यात यावी


-०३ लिंक बेस्ट क्वेश्चन बँक सिस्टम आणि त्वरित निकाल प्रणालीचा अंमल 


या प्रणालीद्वारे पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सर्व विद्यापीठांनी लिंक बेस्ट एक्झाम सिस्टम चा वापर करून पदवी स्तरासाठी 50 गुण पदव्युत्तर पदवी साठी 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्नावली परीक्षा ही लिंक माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ई-मेल अथवा व्हाट्सअप नंबर वरती ती पाठवून निकाल जाहीर करण्यात यावा


-०४ म्हणजेच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी लिंक तयार करून यासाठी यासाठी वेळ वेळ निश्चित करून पी आर एन नंबर आणि ओटीपी देऊन प्रश्नावली सोडविण्यास संदर्भात सूचित करावे


सर्व विद्यापीठांच्या महाविद्यालयांनी परीक्षा घेताना एक्झाम पोर्टल ची निर्मिती करावी यानुसार परीक्षांचे नियंत्रण व नियोजन करण्यात यावे


पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी च्या या ऑनलाईन परीक्षेमुळे गुणदान करणे व त्वरित निकाल जाहीर करणे सोपे होऊन एकत्रित निकाल विद्यापीठास पाठविण्यात यावा


-०५.रिसर्च ओरिएंटेशन ट्रेनिंग प्रोग्राम-


यामध्ये प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसाठी पदवी व पदव्युत्तर रिसर्च ओरिएंटेड प्रोग्रामची प्रशिक्षण पद्धती चा वापर करून विद्यार्थ्यांना संशोधन पद्धती काय असते संशोधन कशा पद्धतीने करावे संशोधनात नाविन्यता कशी येईल यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे म्हणजेच प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेटिव्ह अॕप्लायड  रिसोर्सेस चा वापर करून प्रशिक्षण देणे


-पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना शब्दमर्यादा संशोधन पद्धती या संशोधनामध्ये काय गोष्टी अपेक्षित आहेत अभ्यासक्रमांतून संशोधनासाठी काय करता येईल आणि अभ्यासक्रमातील घटकांचा धोरण निश्चिती व निर्मितीसाठी कसा वापर करता येईल यासाठी प्रशिक्षित करणे गरजेचे आहे


-पदव्युत्तर पदवी च्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रशिक्षित करत असताना आपण करत असलेले संशोधन हे शासन-प्रशासन स्थरावर कसे फायद्याचे ठरेल आणि आपल्या संकल्पना या किती ताकदी असाव्यात यासाठी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे या संशोधनामध्ये वाड़्मय चौर्यता नसावी.
आणि महत्वाचे म्हणजे केलेले संशोधन हे किती मार्गदर्शक ठरेल याची तयारी लेखणीतून होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे गरजेचे आहे.


पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमातील वर्तमान कालीन अभ्यासक्रमा आधारे होत असणारे संशोधन हे धोरण निश्चिती आणि निर्मिती साठी उपयोगात पडेल किंवा यासाठी आणखी काय करावे लागेल याकरिता महाविद्यालयीन संशोधक विद्यार्थी अभ्यास गटाची स्थापना होणे आवश्यक आहे


थोडक्यात वर्तमानकालीन नावीन्यपूर्ण संकल्पना आणि दूरगामी उपाययोजना-


०१. परंपरागत परीक्षा पद्धतीला टास्क ओरिएंटेड एक्झाम सिस्टम हा एक सकारात्मक पर्याय आहे.


०२. विद्यार्थ्यांना संशोधक होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण होय.


०३.शासन-प्रशासन आणि राजकारण पण या क्षेत्रातील धोरण निश्चिती आणि निर्मिती च्या अंमलबजावणीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे.


०४.आजचे विद्यार्थी विद्यार्थीनी हे टेक्नोसॅव्ही म्हणजेच तंत्रज्ञान जाणकार असून परंपरागत परीक्षापद्धती ऐवजी त्यांच्या संशोधन पर जाणिवांचा विकास होण्यासाठी टेक्नोसॅव्ही रिसर्चर तयार होण्यासाठी संशोधन पर परीक्षा पद्धतींचा अवलंब ही एक वर्तमानात उज्वल भविष्याकडे नेण्याची संधी आहे.


०५. आपण काय शिकलो याऐवजी का आणि कशासाठी शिकतोय या शिक्षणाचा उपयोजन आणि सर्जनशील ते साठी कशा पद्धतीने वापर करण्यात येतोय याची माहिती विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण संकल्पना संकल्पनेतून देणे गरजेचे आहे.


०६. विद्यापीठांनी परंपरागत अशा कालबाह्य अभ्यासक्रमांना पूर्णतः बंद करून नाविन्यता पूर्ण अभ्यासक्रमांचा अंमल करणे गरजेचे आहे.


०७.परीक्षा नुसत्या पात्रतेच्या धनी न होता क्षमतेच्या सारथी व्हाव्यात यासाठी पात्रते सोबतच क्षमतेच्या विकासक व्हाव्यात म्हणजेच विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा विकास होणे आवश्यक आहे


०८.महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना महाविद्यालय स्तरावरूनच नीतिमूल्यांची शिक्षण मिळाले तर त्यांच्या वैचारिक क्षमता अधिक प्रगल्भ होऊन ते एक जबाबदार आणि सुजाण नागरिक होतील.


०९.पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना फक्त परीक्षापद्धतीत पुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या नवसंकल्पना संशोधन अभ्यास पद्धती द्वारे व्यापक आणि भविष्यासाठी कालसुसंगत बनवणे हे वर्तमान कालीन परिस्थिती गरजेचे बनले आहे यासाठीच कालबाह्य अभ्यासक्रम किंवा परंपरागत परीक्षा पद्धतीचा टप्प्याटप्प्याने ऱ्हास होऊन नावीन्यपूर्ण संकल्पनेला संधी देणे गरजेचे आहे.


महत्त्वाचे निवेदन-
वरील सर्व नावीन्यपूर्ण उपाययोजना संदर्भात वाचकांची अनेक असहमती आणि संमती असू शकते परंतु वर्तमान कालीन आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक बदलांचा विचार करून मी माझ्या आकलनातून या उपाययोजना महाराष्ट्र व भारतातील तमाम शैक्षणिक संस्थांसाठी विचाराधीन ठेवत आहे आपण आपली मतमतांतरे खाली दिलेले ई-मेल आणि मोबाईल नंबर आधारे कळवाव्यात आपल्या सम्यक सूचनांचे स्वागत...


विनंती-महाराष्ट्रातील बहुतांशी महाविद्यालयात इंटरनेटची सुविधा किंवा वेबसाईट नसली तरी या व्यवस्था उभ्या करणे काळाची गरज बनले आहे त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाने या नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा सौजन्यपूर्ण विचार कर करून माझी मदत असल्यास किंवा यासंबंधी धोरण निश्चिती करावयाची झाल्यास जरूर मला हाक द्यावी


अमीर इनामदार
मोबा-8999270633
ई-मेल- amirinamdar05@gmail.com
profamir2131@gmail.com


-लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून नाविन्यपूर्ण जीवन कौशल्य आणि बदलत्या अभ्यास पद्धतींचा चिकित्सक अभ्यास करतात