आंबेगाव तालुक्यामधुन तीनशे प्रवाशी गावाकडे रवाना

कोरोनो व्हायरस मुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये अडकुन पडलेल्या मंजुरांना आपल्या घराकडे परतण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत. महाराष्ट्र शासनाने  त्यांना एस टी ची सेवा सुरु करण्यात आली आहे. रविवार दि.10 रोजी. आंबेगाव तालुक्यामध्ये अडकलेल्या  300  मजुरांना   11 एस टी बसमध्ये बसवुन रवाना केले.


यावेळी गेली अनेक वर्ष अडकुन पडलेल्या मंजुरांच्या चेहर्यावंर आनंद ओसंडुन वाहत होता. तर काहींच्या डोळ्यात आनंदा अश्रुही आले होते. मंचर व घोडेगाव बसस्थानंकात या एस टी येण्यापुर्वी त्यांचे निर्जतुकीकरण करण्यात आले होते. तर सर्व प्रवाशांची आरोग्य विभागामार्फत लेझर मशीन द्वारे तपासणी करण्यात आली. या  एस टी बस  लातुर उस्मानाबाद, जळगाव साठी प्रत्येकी एक बस तर यवतमाळसाठी आठ एस टी बस सोडण्यात आल्या.


या एस टी बसची व्यवस्थापन  एस टी महामंडळांच्या वतीने वाहतुक अधिक्षक वसंत अरगडे  वाहतुक नियंत्रक मोहम्मद सलील सय्यद,व अमित खेडकर यांनी केले.  या मजुरांना त्यांच्या गावाकडे पोहचवण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी जिंतेद्र डुडी यांनी यशस्वी नियोजन केले. तर या प्रवाशांना सोडवण्यासाठी  तहसिलदार रमा जोशी, पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल लाड, पोलिस उपनिरीक्षक ए एस खंबाळे सरपंच दत्ता गांजाळे,मंडलअधिकारी सुनिल नंदकर  उपस्थित होते.


यां सर्व नियोजनावेळी सुरक्षा देण्यासाठी पोलिस हवालदार आर एम, हिले,जी ए डावखर,पोलिस नाईक एस के काळडोके,कॉन्सटेबल पी एस भुजबळ एस व्ही गवारी, गुप्तवार्ता विभागाचे पोलिस विनोद गायकवाड  हे उपस्थित होते.  महसुल विभागाच्या वतीने तलाठी हेमंत शिगवण, शशांक चौदंते शीला गोदडे हेमंत भागवत विशाल मुंगळे, गोरे मँडम. कोतवाल संदीप पडवळ ननेश मोरे सागर माकर यांनी मजुरांच्या याद्या बनवुन नियोजन करण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. यावेळी एस टी महामंडऴाच्या वाहक व चालकांना मंचर ग्रामंपंचायतीने सँनिटायजर व मास्क देण्यात आले. 


मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने सर्व वाहक व चालकांना जेवण देण्यात आले. यावेळी रवाना झालेल्या मजुर प्रवाशांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रशासनाचे आभार मानले.