कोरोनो प्रंतिबंधासाठी निष्काळजीपणे वागणार्या तहसिलदारांंची बदली करा.

मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी.


आंबेगाव तालुक्यातील जनतेचे फोन न उचलणार्या आणि कोरोनो बाबत निष्काळजीपणे वागणार्या,   रेशंनिगचे धान्य गरीबांपर्यत पोहचवण्यामध्ये  अपयशी ठरणार्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसिलदार रमा जोशी यांच्या ऐवजी नविन सक्षम  आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसिलदार यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.                              


आंबेगाव तालुक्यातील जनतेने   प्रशासनाला  सहकार्य करत कोरोनो  पासून तालुक्याचा अद्यापपर्यंत  बचाव केला  आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्यामध्ये  एकही कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱी म्हणजेच तहसिलदार  निष्काळजी  पणा करत आहेत. सर्वसामान्य जनतेचे फोन न उचललने, कोरोनो विषयक उपाययोजना बाबत जबाबदारीने वागत नाहीत.


   आंबेगाव तालुक्यात मागील आठवड्यात अडीशे तीनशे लोकांनी छुप्या पद्धतीने मुंबई-पुण्याहून प्रवेश केला आहे. ह्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे  होते  त्याबाबतही . तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याकडून कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत . तसेच सरकार कडून  रेशनिंग वरील  धान्य येऊनही तालुक्यातील गोर-गरीबांना धान्य वाटप केले जात नाही . त्यामुळे आंबेगाव तालुक्यात रेशनिग बाबत  व रेशनिंग दुकानदारा बाबत नागरिकांच्या तक्रारी निर्माण होत आहे


. गोर-गरीबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यावरही आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  तथा तहसिलदार यांनी कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. उलट नागरिकांनी फोन केल्यास संबंधित अधिकार्‍याकडून समाधान कारक उत्तर दिली जात नाहीत. किंवा फोन उचलला जात नाही. या गोष्टींना वेळीच आळा नाही घातला तर आंबेगाव तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे  सक्षम आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.


जनतेने आत्तापर्यंत केलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरेल अशी परिस्थीती सध्या आंबेगाव तालुक्यामध्ये असुन जनतेचे फोन न उचलणार्या  व कोरोनो बाबत निष्काळजी पणे वागणार्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसिलदार यांच्या ऐवजी आंबेगाव तालुक्याला नविन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.